नैसर्गिक प्रकाशात भरला ज्ञानाचा वर्ग; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘नो इलेक्ट्रिसिटी डे’ उत्साहात

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी): जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लबच्या वतीने ‘नो इलेक्ट्रिसिटी डे’ हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमांतर्गत शाळेत शक्य तितका वीजेचा वापर टाळून नैसर्गिक प्रकाशात अध्यापन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जेचा विवेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. प्रत्येक वर्गात ऊर्जा बचत व वीज संवर्धनाविषयी घोषवाक्ये, सुविचार आणि जनजागृतीपर संदेश प्रदर्शित करण्यात आले. “गरज नसताना दिवे व पंखे बंद ठेवा”, “ऊर्जा वाचवा – पर्यावरण वाचवा”, “आजची ऊर्जा बचत म्हणजे उद्याचे सुरक्षित भविष्य” आणि “प्रत्येक युनिट वीज वाचवणे हीच खरी राष्ट्रसेवा” अशा संदेशांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीवर आधारित फलक तयार करून शाळा परिसरात जनजागृती केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक ऊर्जा बचतीची शपथ घेत दैनंदिन जीवनात वीजेचा अपव्यय टाळण्याचा संकल्प केला.

विद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना, “ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक बचत नसून भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ऊर्जा बचतीची सवय आपल्या घरापासूनच सुरू करावी,” असे प्रतिपादन केले.

विद्यालयात सातत्याने राबविण्यात येणारे ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’, ‘वृक्ष बँक’, ‘बीज बँक’, ‘पाणी बचत’ यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांबरोबरच ‘नो इलेक्ट्रिसिटी डे’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जाणीव अधिक दृढ केली. इको क्लब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest