जळगाव पोलीस दलाच्या खेळाडूंची राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमक; स्केटिंग व तायक्वांदोमध्ये पदकांची लयलूट

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन):

जुलै २०२६ मध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्केटिंग तसेच तायक्वांदो स्पर्धांमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लब आणि तायक्वांदो खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ४७ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत जळगाव पोलीस स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके पटकावली. विराज मनोज सावळे याने १०० मीटर व रिले स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळविले. रसिका नंदकिशोर पवार, राजवीर नंदकिशोर पवार, देविक विनोद साळुंखे, लावण्या निलेश भोळे यांनी सुवर्णपदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तर आरोही दर्शन गोसावी, मिष्टी निलेश भोळे आणि तन्मय धिरज सोनवणे यांनीही रौप्य व कांस्यपदके जिंकून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

त्यानंतर सोलापूर येथे पार पडलेल्या ८ व्या राष्ट्रीय रोलर स्पोर्ट्स स्केटिंग स्पर्धेत विराज मनोज सावळे याने ३०० मीटर व ५०० मीटर प्रकारात दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. माही स्वप्नील भंगाळे हिने ३०० मीटरमध्ये सुवर्णपदक, तर लिखीत महेश महाजन याने ३०० व ५०० मीटर स्पर्धेत प्रत्येकी रौप्यपदक मिळविले.

याशिवाय, अहिल्यानगर येथे झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेत जळगाव पोलीस दलाच्या तायक्वांदो खेळाडूंनीही उत्कृष्ट कामगिरी केली. आराध्य आकाश परदेशी याने सुवर्णपदक, तर दक्षिका शिरसाट, गौरिकासिंग जाधव आणि याशिका चौधरी यांनी रौप्यपदके मिळविली. गौरांगी जंजाळे आणि लावण्या राकेश पाटील यांनी कांस्यपदक पटकावले.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, वेलफेअर विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे तसेच वेलफेअर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम आणि स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या मेहनतीमुळे जळगाव पोलीस दलाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा आलेख अधिक उंचावला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest