जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई; १० गुन्ह्यांची उकल, ५ अट्टल आरोपी जेरबंद, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जळगाव तालुका पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ अट्टल आरोपींना अटक करून १० गुन्ह्यांची उकल केली असून, एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली. गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांवर ठेवण्यात आलेल्या पाळतीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (टोळीचा मुख्य सूत्रधार), दीपक बापू पाटील, राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी आणि महेश उर्फ संतोष भोई यांचा समावेश आहे.

 

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९ घरफोडी आणि १ दुचाकी चोरी, अशा एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांमधून २ लाख ३० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल तसेच २ लाख रुपयांच्या ४ मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी, जिल्हा पेठ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांमध्ये मिळून १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे गुन्हे सुरू केले होते. मात्र, जळगाव तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, यज्ञजिता येडले तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest