🌈 खेळातून आनंददायी शिक्षण; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘सोपे शिक्षण तास’ उपक्रम

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृती, अनुभव आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सोपे शिक्षण तास’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अक्षर व अंक ओळख, वाचन-लेखन, गणितीय संकल्पना, चित्रकला, हस्तकला, कृतीगीते, गोष्टी, बौद्धिक खेळ, निसर्ग निरीक्षण तसेच जीवनोपयोगी सवयी यांचे शिक्षण विविध कृतींच्या माध्यमातून दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्यातील सहभाग वाढत असून त्यांच्या निरीक्षणशक्ती, विचारक्षमता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाला चालना मिळत आहे.

 

उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ‘3-इन-1 वही’ देण्यात आली असून त्यामध्ये दररोजच्या कृती, सराव आणि शैक्षणिक उपक्रमांची नोंद केली जात आहे. खेळत-खेळत शिकण्याच्या या पद्धतीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्गातील वातावरण अधिक आनंददायी आणि उत्साही बनले आहे.

 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने शाळा सातत्याने विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेला ‘सोपे शिक्षण तास’ हा उपक्रम पालक, शिक्षणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांकडूनही कौतुकास पात्र ठरत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

अनैतिक संबंधाच्या संशयातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; एमआयडीसी पोलिसांकडून...

जळगाव (प्रतिनिधी इमरान खान): अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे घडली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, मूळ...

जळगाव शहर वाहतूक शाखेची वाळूमाफियांवर कारवाई; अवैध वाळूसह ३...

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने प्रभावी कारवाई केली आहे. तरसोद फाट्यावरील पुलावर विशेष गस्तीदरम्यान अवैध...

३२ हजार ४९० झाडांच्या रक्षणासाठी जळगावकरांचा आवाज!भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना...

जळगाव : (प्रतिनिधी: राजू शेख): भीमाशंकर परिसरातील ३२ हजार ४९० झाडांची वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निषेध निवेदन...

संपादक - रजत शेख

Latest