संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम; वारकऱ्यांना एक लाख बियाण्यांचे वितरण

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पर्यावरण समिती व सीड बँक (बीज बँक) उपक्रमांतर्गत संकलित करण्यात आलेल्या तब्बल एक लाख बियाण्यांचे आषाढी वारीतील वारकऱ्यांना वितरण करण्यात आले.

श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव यांच्या वतीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना वाटपासाठी ही बियाणे ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याकडे सप्रेम सुपूर्द करण्यात आली. “एक वारकरी – एक बीज, हरित महाराष्ट्राची वीण” हा पर्यावरणपूरक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी ग्रीन फाउंडेशनचे विजय वाणी यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि बीज संकलनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक वारकऱ्याने किमान एक तरी बीज रुजवून त्याचे वृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी वर्षभर सीड बँकेत जमा केलेल्या विविध वृक्षांच्या बियाण्यांचा या उपक्रमासाठी उपयोग करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी शाळेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest