संत ज्ञानेश्वर विद्यालयात शालेय विकास आराखडा सादर;

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शालेय व्यवस्थापन समितीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षासाठीचा शालेय विकास आराखडा (School Development Plan – SDP) समितीसमोर सादर करण्यात आला.

सादर करण्यात आलेल्या आराखड्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, शाळेतील पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता व आरोग्यविषयक कार्यक्रम, डिजिटल शिक्षणाचा विस्तार, पर्यावरण संवर्धन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

बैठकीदरम्यान समिती सदस्यांनी आराखड्यावर सकारात्मक चर्चा करत विविध सूचना मांडल्या. शाळेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शालेय विकास आराखड्याची सविस्तर माहिती देत आगामी उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. बैठकीस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक प्रतिनिधी तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक व सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देणे हेच शाळेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आली आहे


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest