आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘स्माईल योग’ उपक्रम

Spread the love

मेहरूण( प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांसाठी ‘स्माईल योग’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना योगाची ओळख आनंददायी, खेळकर आणि सहज पद्धतीने करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी हास्ययोग, श्वसनक्रिया तसेच फुलपाखरू आसन, वृक्षासन, सर्पासन यांसारखी विविध सोपी योगासने उत्साहाने सादर केली. विविध कृती, खेळ आणि सामूहिक हास्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योगाचा आनंद घेतला. यावेळी ‘हसा आणि निरोगी रहा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते तसेच सकारात्मक जीवनशैली विकसित होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा व आनंदी राहण्याचा संकल्प केला.

या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest