संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इको क्लबतर्फे हजारो वृक्षबियाण्यांची भेट देत मान्यवरांचा सत्कार

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव येथे लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या हिरवा अंकुर पर्यावरण महोत्सवा संदर्भात चर्चा करण्यासाठी हिरवा अंकुर फाउंडेशनच्या नलिनी शहा, निलय शहा तसेच ग्रीन फाउंडेशनचे विजय वाणी यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे सदिच्छा भेट दिली.

यावेळी विद्यालयाच्या इको क्लबतर्फे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी मान्यवरांना हजारो वृक्षबियाण्यांची पाकिटे भेट स्वरूपात देऊन त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षलागवड, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच हिरवा अंकुर पर्यावरण महोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक वृक्षलागवड करून पर्यावरण जनजागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शीतल कोळी तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest