संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध समित्यांची स्थापना; करिष्मा चव्हाण यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखपदाची धुरा

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी :सरिता महाजन) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे प्रभावी नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या समित्या कार्यरत राहणार आहेत.

यामध्ये प्रसिद्धी प्रमुख समितीची जबाबदारी करिष्मा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शाळेतील विविध उपक्रम, कार्यक्रम व विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या पार पाडणार आहेत.

प्रसिद्धी प्रमुख समितीमार्फत शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण व सामाजिक उपक्रमांची माहिती वर्तमानपत्रे, सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांद्वारे प्रसारित केली जाणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांचे छायाचित्रण, बातमी लेखन, प्रवेश अभियानाची प्रसिद्धी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीची नोंद तसेच शाळेच्या उपक्रमांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे.

करिष्मा चव्हाण यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest