एकही बालक राहू नये शाळेबाहेर’; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची घराघरांत शोध मोहीम सुरू

Spread the love

मेहरूण(प्रतिनिधी) : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या एकाही बालकाला वंचित ठेवायचे नाही, या निर्धाराने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांनी शाळाबाह्य, स्थलांतरित व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

या मोहिमेअंतर्गत विद्यालयातील शिक्षक घराघरांत जाऊन सर्वेक्षण करत असून शाळाबाह्य, स्थलांतरित तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती संकलित करत आहेत. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक बालकाची नोंद घेऊन त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असून कोणतेही मूल शिक्षणापासून दूर राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे शिक्षणाचा प्रकाश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास विद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

विद्यालयाच्या वतीने पालक, नागरिक व सामाजिक संस्थांनी या मोहिमेला सहकार्य करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“प्रत्येक बालक शाळेत… प्रत्येक बालक शिक्षित!” हा संदेश देत विद्यालयाची ही जनजागृती व शोध मोहीम परिसरात उत्साहात राबविण्यात येत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest