गोवंश मांसाची बेकायदेशीर वाहतूक करताना आरोपी जेरबंद; ७० किलो मांसासह रिक्षा जप्त

जळगाव (प्रतिनिधी):

शहरातील भुसावळ रोडवरील स्वामीनारायण मंदिरासमोर, दूरदर्शन टॉवर परिसरात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत सुमारे ७० किलो गोवंश मांस व वाहतुकीस वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.२५ वाजता, आरोपी शेख जमीर मेहबुब (वय ५४, रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव) हा त्याच्या ताब्यातील बजाज कंपनीच्या MH-19 V-7745 क्रमांकाच्या तीन चाकी रिक्षामधून गोवंश जनावराची कत्तल करून छोटे तुकडे केलेले अंदाजे ७० किलो वजनाचे मांस विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे आढळून आले.

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी गोवंश मांसासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ०८३/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५, ५(क), ९ व ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत

ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले,

पोलीस हवालदार क्र. २९२२ रामदास कुंभार,

पोलीस हवालदार क्र. ९११ गिरीश पाटील,

सफौ क्र. ०५ विजय सिंह पाटील,

पोलीस नाईक क्र. १० प्रदीप चौधरी,

पोलीस कॉन्स्टेबल क्र. १२९५ विनोद आस्कर

यांनी सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS