लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी):

शहरात लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल रमेश राठोड (वय २५, रा. पिंप्राळा, जळगाव) याने दि. २९ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता संबंधित मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिला गुजरात राज्यातील सुरत येथे नेण्यात आले.

दि. ३० जानेवारी रोजी रात्री सुरत येथील एका घरात आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला तसेच या घटनेबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पीडिता जळगाव येथे परतल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते करीत आ

← Back

Thank you for your response. ✨

हेत.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS