अनैतिक संबंधाच्या संशयातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला अटक

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी इमरान खान): अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे घडली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, मूळ रा. कारके वस्ती, लोणावळा, जि. पुणे) यांचा मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी मुकुंदा प्रल्हाद पाटील (वय ४२, रा. शिरसोली प्र. न., ता. जि. जळगाव) याला तातडीने ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी गोरख ठाकूर हे शिरसोली येथील आपल्या नातेवाइकांच्या घरी आले होते. यावेळी त्यांचा मुकुंदा पाटील याच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने लाकडी दांडका आणि फावड्याच्या साहाय्याने ठाकूर यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शिरसोली व परिसरात तपास सुरू केला.

 

आरोपी मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शिरसोली गावात लपून बसल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या वादातून मारहाण केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदा पाटील याला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या पथकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीष पाटील, धनराज गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, राहुल घेटे, किरण पाटील आणि गणेश ठाकरे यांचा समावेश होता.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, चोरीच्या पाच...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...

जळगावच्या रथ चौकात पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल...

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक...

जळगाव शहर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; १० लाख ९५...

जळगाव(प्रतिनिधी : राजू शेख) दि. १७ : जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अडावद येथील दोन तरुणांकडून तब्बल १०...

संपादक - रजत शेख

Latest