संत ज्ञानेश्वर विद्यालयात गणित मंडळातर्फे गणित जत्रा उत्साहात साजरी

जळगाव(जिल्हा प्रतिनिधी सरिता महाजन)

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील गणित मंडळातर्फे आकर्षक गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या गणित जत्रेत विद्यार्थ्यांनी विविध गणितीय संकल्पनांवर आधारित भूमितीची मॉडेल्स, गणिती कोडी, प्रात्यक्षिके, तर्कशक्ती वाढवणारे खेळ, अबॅकस, मोजमाप साधने आदींचे स्टॉल्स उभारले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता व गणिती कौशल्याचे प्रभावी सादरीकरण पाहून उपस्थित शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन गणित तज्ञ रूपाली आव्हाड मॅडम व दिनेश पाटील सर यांनी केले. त्यांनी गणितातील विविध संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगत विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी आवड निर्माण केली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गणित शिक्षकांचे स्वागतही मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी गणित दिनाचे महत्त्व स्पष्ट करत, “विद्यार्थ्यांनी गणिताची भीती न बाळगता ते समजून घेण्याची सवय लावली पाहिजे,” असा संदेश दिला.

या गणित जत्रेला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS