घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 2.76 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

नरडाणा(प्रतिनिधी : राहील देशमुख):शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक करून नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या टोळीकडून एकूण 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

दि. 6 जून 2026 रोजी मध्यरात्री ते 7 जून रोजी पहाटे दरम्यान डाबली येथील अरुण मुरलीधर पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, बेन्टेक्स पोत व मोबाईल फोन असा सुमारे 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 109/2026 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना नरडाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोरख सुरेश पवार (वय 19), गोकुळ छगन भिल (वय 20), बादल राजू सोनवणे (वय 18) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी डाबली, मेलाणे आणि नरडाणा येथे घरफोडी व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, बेन्टेक्स पोत, सहा मोबाईल फोन आणि बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे नरडाणा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 96/2026 आणि 109/2026 असे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले, विजय पाटील, रविंद्र शिंदे तसेच नरडाणा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मंगरूळजवळ भीषण तिहेरी अपघात; 5 ठार, 1 गंभीर तर...

अमळनेर(प्रतिनिधी):दि. 9 जून : अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास कार, मोटारसायकल आणि एसटी बस यांच्यात भीषण...

गांधी चौक पोलिसांची मोठी कामगिरी : हरवलेले 10 मोबाईल...

लातूर(प्रतिनिधी ):दि. 8 जून : नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी गांधी चौक पोलीस ठाण्याने केली आहे. पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने...

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय सज्ज; शाळा पूर्वतयारी...

जळगाव(प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शाळा...

संपादक - रजत शेख

Latest