फत्तेपुर पोलिसांची गुटखा तस्करांविरुद्ध कारवाई; १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

Spread the love

फत्तेपुर (प्रतिनिधी: सतीश राठोड): प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध फत्तेपुर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली. या कारवाईत विमल पानमसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखू आणि इलेक्ट्रिक स्कूटर असा एकूण १ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २२ ऑक्टोबरच्या रात्री फत्तेपुर ते कसबापिंप्री रस्त्यावरील हिंगणे फाट्याजवळ करण्यात आली.

 

प्रसाद दामू वाणी (वय २१, रा. चिंचोलीपिंप्री, ता. जामनेर, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. फत्तेपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती प्रतिबंधित विमल पानमसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणे फाट्याजवळ सापळा रचून रात्री साडेदहाच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्याकडून २९ हजार ४० रुपयांचा विमल पानमसाला, ७ हजार २६० रुपयांची व्ही-१ सुगंधित तंबाखू आणि ७० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर (क्रमांक एमएच-१९-ईवाय-१३५७) असा एकूण १ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून २३ ऑक्टोबर रोजी फत्तेपुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रसाद वाणी याला २३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फत्तेपुर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

गोदावरी कॉलेजजवळ कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला; तीन आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी:इमरान खान): शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३)...

पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत, २.८५...

पहूर(प्रतिनिधी: मुकेश): पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता,...

नागद परिसरात बिबट्याची दहशत; हल्ल्यात गाय ठार पांगरा-लोझा शिवारातील...

नागद (प्रतिनिधी : संतोष परदेशी):पांगरा-लोझा शिवारात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात बांधलेल्या पाळीव गाईवर हल्ला करून तिला...

संपादक - रजत शेख

Latest