विद्यार्थी बनले ‘विद्युत दूत’; सौरऊर्जेसाठी जनजागृती! संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इको क्लबचा उपक्रम; स्नॅप सोलर एनर्जीचे आर्थिक सहकार्य

Spread the love

जळगाव ( प्रतिनिधी: इमरान खान): वीजबचत, पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील ऊर्जासुरक्षेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या इको क्लबने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी ‘विद्युत दूत’ बनून पालक व नागरिकांमध्ये सौरऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती करीत आहेत.

वाढती विजेची मागणी आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याचे तसेच अक्षय ऊर्जेचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या उपक्रमात विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांपर्यंत सौरऊर्जेचे महत्त्व पोहोचविणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव, सामाजिक उत्तरदायित्व आणि ऊर्जा बचतीचे संस्कार रुजविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

संस्थाध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मुकेश नाईक, इको क्लब प्रमुख रूपाली आव्हाड, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. या जनजागृती मोहिमेसाठी स्नॅप सोलर एनर्जीचे संचालक सागर सानप यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले आहे.

 

‘आज सौरऊर्जेचा स्वीकार करूया, उद्याच्या ऊर्जासुरक्षेसाठी हातभार लावूया’ हा संदेश देत संत ज्ञानेश्वर विद्यालयाने शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा स्वावलंबनाची सामाजिक जबाबदारी जपणारा आदर्श उपक्रम राबविला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

सातारा तालुका पोलिसांचा गांजा तस्करांवर मोठा प्रहार! २४ किलो...

सातारा (प्रतिनिधी : मोसिन शेख ) : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, सातारा तालुका पोलिसांच्या...

जळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, चोरीच्या पाच...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...

जळगावच्या रथ चौकात पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल...

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक...

संपादक - रजत शेख

Latest