संत ज्ञानेश्वर विद्यालयाची राष्ट्रीय स्तरावर बाजी!

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: आसमां शेख): आरोग्य भारतीतर्फे जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूणच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.

 

विद्यार्थिनी चैताली इंदलकर, अंकिता यादव आणि आरोही सोनार यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या बियाणे बँक, वृक्षबिया संकलन, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तुनिर्मिती अशा विविध उपक्रमांची माहिती सादर केली.

 

या कार्यशाळेला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, पद्मश्री चैत्राम पवार, आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पद्मश्री चैत्राम पवार यांनी विद्यालयाच्या सादरीकरणाला भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी त्यांना फुलांच्या गुच्छाऐवजी वृक्षबिया भेट देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.

 

मुख्याध्यापक मुकेश नाईक व पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. विद्यार्थिनींच्या कल्पकतेला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

रावेर पोलिसांची गांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई! घरावर छापा टाकून...

जळगाव( प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात रावेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाल (ता. रावेर) येथे एका संशयिताच्या...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर कारवाई करा; घेतलेले शासकीय लाभ...

जळगाव(प्रतिनिधी : राजू शेख): दि. १६ नोव्हेंबर : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध विभागांत कार्यरत असलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर तातडीने बडतर्फी व निलंबनाची...

कानळदात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी पारंपरिक...

कानळदा (प्रतिनिधी: इमरान खान): (ता. जळगाव) : येथील गावकऱ्यांच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि...

संपादक - रजत शेख

Latest