चिमुकल्यांचा मानवी कंदील; फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प!

Spread the love

जळगाव :(प्रतिनिधी : हिरालाल राजपूत): शहरातील रामेश्वर कॉलनी दप्तरमुक्त शनिवारच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी मानवी कंदील साकारत एकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.

 

विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, एकजूट आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण तसेच पशुपक्षी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

यानंतर चिमुकल्यांनी फटाके न फोडण्याची, प्रदूषण टाळण्याची आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. ‘फटाके नकोत, निसर्ग हवा; प्रदूषण नको, शुद्ध हवा!’ असा संदेश देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

 

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. दप्तरमुक्त शनिवारच्या माध्यमातून कृतीतून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

सातारा तालुका पोलिसांचा गांजा तस्करांवर मोठा प्रहार! २४ किलो...

सातारा (प्रतिनिधी : मोसिन शेख ) : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, सातारा तालुका पोलिसांच्या...

जळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, चोरीच्या पाच...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...

जळगावच्या रथ चौकात पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल...

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक...

संपादक - रजत शेख

Latest