श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्रदान करण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करण्यात आले. तसेच आगामी शैक्षणिक वर्षात अधिक मेहनत घेऊन उज्ज्वल यश संपादन करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्ष श्री. प्रशांत नाईक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिक्षणासोबतच चांगले संस्कार, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही तितकेच महत्त्व देण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणपत्रिका स्वीकारताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यालयातील शिक्षकांनी केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest