इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात जळगावात काँग्रेस आक्रमक; भाजपा सरकारचा निषेध करत वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट्स

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि सीएनजीच्या दरांविरोधात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी, जळगाव शहर काँग्रेस तसेच रावेर लोकसभा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. जळगाव शहरातील पांडे चौक येथील पेट्रोल पंपावर हे आगळेवेगळे आंदोलन पार पडले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या निषेधार्थ नागरिक आणि वाहनधारकांना ‘मेलोडी’ चॉकलेट्सचे वाटप केले. “मोदी सरकारचे अच्छे दिन म्हणजेच महागाई” असा टोला लगावत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.

पेट्रोल पंपावरील निदर्शनांनंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारविरोधात निषेध नोंदविला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून, इंधन व गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, जळगाव महानगर अध्यक्ष जमीन शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सचिव मुफ्ती हारून नदवी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी शहराध्यक्ष शामकांत तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

तसेच नगरसेवक केतन किरंगे, युवक नेते मुक्तदीर देशमुख, श्रीधर चौधरी, विजय वाणी, अॅड. अंकुश कटारे, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पटेल, मुक्तार शहा, प्रशांत सांगोरे, नीलू शेठ चौधरी, प्रदीप सोनवणे, राहुल भालेराव, जगदीश गाडे, मीराताई सोनवणे, छायाताई कोरडे, अर्चनाताई गाडे, लीलाताई सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest