जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांचा प्रश्न पेटला; स्मार्ट कंपनीविरोधात संताप

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी):शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे स्वच्छता व दैनंदिन सेवा पुरवणाऱ्या स्मार्ट कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक अशोक एस. लाडवंजारी यांनी अधिष्ठात्यांना निवेदन देत कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या साई मल्टी सर्व्हिसेसच्या ६० ते ८० कर्मचाऱ्यांना तातडीने पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, मागील काही दिवसांपासून साई मल्टी सर्व्हिसेसचे काम अचानक बंद करण्यात आल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. स्वच्छता आणि अत्यावश्यक सेवा प्रभावित झाल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय, संबंधित कंपनीने नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित युवकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कोरोना काळापासून सेवा देणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कामगारांना तात्काळ पुन्हा रुजू करून घ्यावे, अन्यथा मुलाबाळांसह अधिष्ठात्यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तीन मंत्रीपदे असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप न्यूरोसर्जनची नियुक्ती न झाल्याने गंभीर रुग्णांचे हाल होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. तातडीने न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अशोक एस. लाडवंजारी, राजुभाऊ मोरे, किरण राजपूत आणि सुनील माळी यांनी दिला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest