आमोदा येथे तलाठ्याला १ हजारांची लाच घेताना पकडले; एसीबीची कारवाई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख):शेताच्या सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची (बोअरवेल) नोंद घेऊन त्याचा उतारा देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ३ हजार ५०० रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित १ हजार रुपये घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (६ ऑक्टोबर) यावल तालुक्यातील आमोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली.

शैलेश अंकुश झोटे (वय ३८), तलाठी, सजा आमोदा, ता. यावल, जि. जळगाव, सध्या रा. रावेर, मूळ रा. मेहकर, जि. बुलढाणा असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार शेतकऱ्याने सिंचनासाठी शेतात कुपनलिका केली होती. शासनाच्या योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसविण्यासाठी सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद असणे आवश्यक असल्याने त्यांनी तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे नोंद करण्यासाठी संपर्क साधला. त्यावेळी नोंद घेऊन उतारा देण्यासाठी तलाठ्याने ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने यापूर्वी ३ हजार ५०० रुपये दिले होते.

त्यानंतर उर्वरित ५०० रुपये तसेच सातबारा उतारा देण्यासाठी अतिरिक्त ५०० रुपये, असे एकूण १ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार ६ ऑक्टोबर रोजी जळगाव एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर आमोदा ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी तलाठी शैलेश झोटे यांनी पंचांसमक्ष १ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांचा समावेश होता.

या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझी यशोगाथा’; युवा उद्योजक सचिन घुगे...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन) :विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण व्हावी, कष्ट, जिद्द, सातत्य आणि कौशल्याच्या माध्यमातून यशस्वी होता येते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने सेवा...

पाचोरा शहरातील बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस; मध्यप्रदेशातून आरोपी ताब्यात...

पाचोरा (प्रतिनिधी: मुकेश कोळी): पाचोरा शहरातील बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पाचोरा पोलिसांना यश आले असून, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून एका आंतरराज्यीय आरोपीला ताब्यात घेण्यात...

यावलमध्ये देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त; २५...

यावल(प्रतिनिधी : राजू शेख): आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून नाकाबंदी व गस्तीदरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक...

संपादक - रजत शेख

Latest