यावलमध्ये देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त; २५ वर्षीय तरुणाला अटक

Spread the love

यावल(प्रतिनिधी : राजू शेख): आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून नाकाबंदी व गस्तीदरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना पवन सोनवणे हा देशी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने किनगाव परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास यावल-चोपडा महामार्गावर किनगाव गावाच्या अलीकडे हॉटेल श्रीसमोर संशयित पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) याला ताब्यात घेण्यात आले.

अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक लोखंडी देशी बनावटीचा पिस्तूल (कट्टा) तसेच पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी शस्त्र व काडतुसे जप्त केली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५६/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५(१-ब)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी, मयूर निकम, सचिन घुगे, तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद व पोलीस कॉन्स्टेबल हितेश बागुल सहभागी होते. कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

आरोपी पवन सोनवणे याला अटक करण्यात आली असून, त्याला ४ ऑक्टोबर रोजी यावल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चामुळे जळगावातील वाहतुकीत तात्पुरते बदल

जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख) : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्यातर्फे रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शिवतीर्थ मैदान येथील...

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील वाहतुकीत तात्पुरता बदल

जळगाव (प्रतिनिधी : राजू शेख) :अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शिवतीर्थ मैदान...

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; तीन गावठी कट्टे आणि...

जळगाव : (प्रतिनिधी: इमरान खान): अवैध अग्निशस्त्रांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. या...

संपादक - रजत शेख

Latest