जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील वाहतुकीत तात्पुरता बदल

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी : राजू शेख) :अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शिवतीर्थ मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जळगाव शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

 

मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी १ ऑक्टोबर रोजी बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आकाशवाणी चौक ते कोर्ट चौकदरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

मोर्चाचे नेतृत्व व मार्गदर्शन रामदास आठवले, माजी समाजकल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार चंद्रकांत हंडोरे, दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार, आनंदराज आंबेडकर आदी करणार असल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :

 

१) आकाशवाणी चौक ते कोर्ट चौक :

आकाशवाणी चौक – कवयित्री बहिणाबाई उद्यान – रिंगरोड – गोकुळ स्वीट मार्ट – शाहू कॉम्प्लेक्स – कोर्ट चौक.

 

२) कोर्ट चौक ते आकाशवाणी चौक :

कोर्ट चौक – शाहू कॉम्प्लेक्स – गोकुळ स्वीट मार्ट – रिंगरोड – कवयित्री बहिणाबाई उद्यान – आकाशवाणी चौक.

 

३) नेरी नाका येथून स्वतंत्र चौकाकडे जाणारी वाहने :

नेरी नाका – पांडे चौक – सिव्हील हॉस्पिटल – बेंडाळे चौक – चित्रा चौक – कोर्ट चौक.

 

४) प्रभात चौक ते नेरी नाका/कोर्ट चौक :

प्रभात चौक – कवयित्री बहिणाबाई उद्यान – रिंगरोड – गोकुळ स्वीट मार्ट – शाहू कॉम्प्लेक्स – कोर्ट चौक – चित्रा चौक – बेंडाळे चौक – नेरी नाका.

 

मोर्चाच्या काळात नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; तीन गावठी कट्टे आणि...

जळगाव : (प्रतिनिधी: इमरान खान): अवैध अग्निशस्त्रांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. या...

ज्येष्ठांच्या आशीर्वादासोबत पर्यावरणाचा संदेश; संत ज्ञानेश्वर विद्यालयात अनोखा उपक्रम

मेहरूण (प्रतिनिधी : सरिता महाजन) : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘ज्येष्ठांच्या पायाशी संस्कार’ हा...

रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणारे तिघे ताब्यात;...

भुसावळ(प्रतिनिधी: सतीश दहीकर) : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना...

संपादक - रजत शेख

Latest