घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस; दोघे ताब्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): शहरातील गणपतीनगर परिसरात घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

 

तुषार गोविंदा गायकवाड हे २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुटुंबासह सुरभी लॉन, अजिंठा रोड येथे कार्यक्रमासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी रात्री साडेबारा वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कोंडा व कुलूप तुटलेले दिसले. घरातील बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील ३९ हजार ५०० रुपये रोख, चांदीचे दागिने, सुमारे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन, कपडे, कॉस्मेटिक साहित्य असा एकूण सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आढळून आले.

 

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक २७३/२०२६, बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपास पथकाला घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तसेच नुकताच येरवडा कारागृहातून बाहेर आलेला समीर हनीफ काकर (रा. तांबापुरा) याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत सचिन शंकर साळुंखे (रा. तांबापुरा) यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार समीर काकर याच्याविरुद्ध यापूर्वी १३ गुन्हे दाखल आहेत.

 

तपासादरम्यान संशयितांकडून आतापर्यंत सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बेंटेक्स साहित्य, चांदीचे जोडवे आणि ५ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत सपोनि वारुंगसे, पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे आणि मुकुंद गवते यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणातील चार आरोपी जळगावात ताब्यात शनिपेठ...

जळगाव (प्रतिनिधी): १ ऑक्टोबर २०२६   हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणात फरार असलेल्या चार आरोपींना शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जळगाव शहरातून ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून...

‘माझ्या पाल्याची प्रगती, माझी जबाबदारी’; पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन):मेहरूण येथील रोजी आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सवयी, वर्तन, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी आणि सर्वांगीण विकासात पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने...

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; ऊसाच्या शेतातून १ कोटी...

अक्कलकोट (प्रतिनिधी: मोसिन शेख) : अंमली पदार्थांविरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मौजे आळगी, ता....

संपादक - रजत शेख

Latest