हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणातील चार आरोपी जळगावात ताब्यात शनिपेठ पोलिसांची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): १ ऑक्टोबर २०२६

 

हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणात फरार असलेल्या चार आरोपींना शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जळगाव शहरातून ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी ही कारवाई केली.

 

हिमाचल प्रदेश पोलिसांनी फोनद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मयत आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला. आरोपींनी खून करून मृतदेह तलावात फेकल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

 

घटनेनंतर आरोपी किसनपूर येथून अंबाला येथे गेले. त्यानंतर ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना पैसे संपल्याने व भूक लागल्याने जळगाव येथे उतरले होते. जळगावमध्ये मोबाईल विकण्यासाठी ते आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

या प्रकरणात हिमाचल प्रदेश पोलिसांकडून शोध सुरू असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

 

1. चंदन कुमार, रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार

2. रोशन गोगल मुखिया, रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार

3. संतोष कुमार, रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार

4. अजित कुमार जोगा मेहतो, रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार

 

या आरोपींचे लोकेशन शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

 

यानंतर परि. पोउनि संतोष खेडकर, पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल नवजीत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे यांच्या पथकाने शोधमोहीम राबवली.

 

पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत चारही आरोपींना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले.

 

ताब्यात घेतलेल्या आरोपींबाबतची माहिती हिमाचल प्रदेशातील संबंधित पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांच्याशी समन्वय साधण्यात येत असल्याचे शनिपेठ पोलिसांनी सांगितले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘माझ्या पाल्याची प्रगती, माझी जबाबदारी’; पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन):मेहरूण येथील रोजी आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सवयी, वर्तन, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी आणि सर्वांगीण विकासात पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने...

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; ऊसाच्या शेतातून १ कोटी...

अक्कलकोट (प्रतिनिधी: मोसिन शेख) : अंमली पदार्थांविरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मौजे आळगी, ता....

धरणगावातील चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेकडून...

जळगाव(प्रतिनिधी): ३० सप्टेंबर २०२६ धरणगाव शहरातील सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळून चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. या...

संपादक - रजत शेख

Latest