धरणगाव आठवडे बाजारातील लूटप्रकरणाचा छडा; नातेवाईक असल्याचे भासवून लुटणारा आरोपी ताब्यात ८ हजारांची रोकड हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): ३० सप्टेंबर २०२६

 

धरणगाव येथील आठवडे बाजारात नातेवाईक असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून रोख रक्कम हिसकावून नेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणातील दिगंबर कौतिक मानकर, रा. शिवशंकर नगर, असोदा रोड, जळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ८ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी हे धरणगावच्या आठवडे बाजारात खरेदीसाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने आपण त्यांचा जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून त्यांच्याकडील सुमारे ८,५०० रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

 

या घटनेप्रकरणी २९ सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दिगंबर कौतिक मानकर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून ८,००० रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

 

आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोना/३१३४ ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.

 

कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ विष्णु बिन्हाडे, पोहेकॉ दीपक माळी, पोहेकॉ रवींद्र पाटील, पोहेकॉ हरिलाल पाटील, पोहेकॉ निलेश सोनवणे, पोको राहुल कोळी आणि पोहेकॉ विलास गायकवाड यांचा सहभाग होता.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘माझ्या पाल्याची प्रगती, माझी जबाबदारी’; पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन):मेहरूण येथील रोजी आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सवयी, वर्तन, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी आणि सर्वांगीण विकासात पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने...

अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; ऊसाच्या शेतातून १ कोटी...

अक्कलकोट (प्रतिनिधी: मोसिन शेख) : अंमली पदार्थांविरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी मौजे आळगी, ता....

धरणगावातील चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेकडून...

जळगाव(प्रतिनिधी): ३० सप्टेंबर २०२६ धरणगाव शहरातील सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळून चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. या...

संपादक - रजत शेख

Latest