मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा १२ तासांत उघडकीस; १२,५५० रुपयांची रोकड हस्तगत

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयितासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दानपेटीतील १२ हजार ५५० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

 

२७ सप्टेंबर रोजी नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी योगेश्वर देविदास पाटील यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय यंत्रणेच्या माध्यमातून तपासाला वेग देण्यात आला.

 

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रकांत भागवक पाटील (रा. दशरथ नगर, जळगाव) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून एकूण १२,५५० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

 

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सांळुखे करीत आहेत.

 

तपास पथकाची कामगिरी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

कारवाईत परिपोउनि संतोष खेडकर, परिपोउनि अभिषेक कटारे, पोहेकॉ. विजय खैरे, पोहेकॉ. योगेश जाधव, पोहेकॉ. अनिल सांळुखे, पोको. पराग दुसाने, पोको. अमोल वंजारी, पोको. निलेश घुगे, पोको. गणेश ढाकणे, पोको. योगेश साबळे, पोको. नवजित चौधरी तसेच सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक पोको. मुबारक देशमुख यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

माहिती हा अधिकार, लोकशाहीचा आधार; संत ज्ञानेश्वर विद्यालयात माहिती...

मेहरूण (प्रतिनिधी): नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, तसेच प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक...

११ डझन केळींचा भोग अर्पण करून संत ज्ञानेश्वर विद्यालयात...

मेहरूण(प्रतिनिधी ): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच पारंपरिक संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर...

बांधकाम कामगार व बिल्डिंग पेंटर संघटनांच्या विविध मागण्या आमदार...

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या....

संपादक - रजत शेख

Latest