बांधकाम कामगार व बिल्डिंग पेंटर संघटनांच्या विविध मागण्या आमदार मनीषा कायंदे यांच्यासमोर

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बिल्डिंग पेंटर असोसिएशन तसेच बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाशी संबंधित विविध मागण्या आमदार कायंदे यांच्यासमोर मांडल्या.

कामगार संघटनांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बंद असलेल्या विविध योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दिवाळी बोनस पुन्हा सुरू करून तो वाढीव ५ हजार रुपये करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

 

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सन २०१३ मध्ये मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ३ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. त्यानंतर ही योजना बंद झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

 

याशिवाय नवीन बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याची मागणी करण्यात आली. सध्या नवीन नोंदणीची तारीख मिळण्यासाठी जवळपास एक वर्ष प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा संघटनांनी मांडला. हा कालावधी कमी करून दोन ते तीन महिन्यांच्या आत नोंदणीची तारीख उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कामगारांना होणारा त्रास कमी होईल, अशी मागणी करण्यात आली.

 

यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. संबंधित प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडून शासनाच्या स्तरावर कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

या वेळी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रवीण चौधरी, बिल्डिंग पेंटर युनियनचे अध्यक्ष इस्माईल भाई, बिल्डिंग पेंटर युनियन प्रभारी कैलास बावरी, तसेच रोशन शाह, हृदयातखान बाबा, इम्रान पेंटर, मोईन पेंटर, भाषा भाई, अमित पेंटर, जावई, इमरान खान यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा १२ तासांत उघडकीस; १२,५५० रुपयांची...

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही...

माहिती हा अधिकार, लोकशाहीचा आधार; संत ज्ञानेश्वर विद्यालयात माहिती...

मेहरूण (प्रतिनिधी): नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, तसेच प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक...

११ डझन केळींचा भोग अर्पण करून संत ज्ञानेश्वर विद्यालयात...

मेहरूण(प्रतिनिधी ): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच पारंपरिक संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर...

संपादक - रजत शेख

Latest