विमानतळ परिसरातून प्रवाशाचा हरवलेला मोबाईल परत; रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी इमरान खान) :शहरातील विमानतळ परिसरातून रिक्षाने प्रवास करताना प्रवाशाचा रिक्षात राहून गेलेला मोबाईल रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केला. या घटनेमुळे रिक्षाचालकाच्या माणुसकीचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

 

कुसुंबा येथील रहिवासी रामदास प्रकाश पाटील हे रिक्षाचालक आहेत. त्यांनी जळगाव विमानतळ येथून सुरत येथील रहिवासी रुपचंद खलनानी यांना रिक्षातून प्रवासासाठी नेले होते. प्रवासादरम्यान खलनानी यांचा मोबाईल रिक्षामध्येच राहून गेला.

 

मोबाईल रिक्षामध्ये आढळल्यानंतर रामदास पाटील यांनी तो स्वतःकडे न ठेवता पो.हे.कॉ. गजानन अर्जुन महाजन यांच्या मदतीने संबंधित प्रवाशाशी संपर्क साधून मोबाईल परत केला.

 

हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने रुपचंद खलनानी यांनी रिक्षाचालक रामदास पाटील यांचे आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीच्या भावनेचे कौतुक होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; प्रवासी सुखरूप

पनवेल( प्रतिनिधी) :२४ सप्टेंबर २०२६ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल हद्दीतील किलोमीटर क्रमांक १६ जवळ गुरुवारी सकाळी सुमारे ७:४५ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या...

‘माझा बाप्पा – माझी संस्कृती’ उपक्रमातून Bappa.org विषयी जनजागृती

मेहरूण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने Bappa.org अंतर्गत ‘माझा बाप्पा – माझी संस्कृती’ हा उपक्रम श्री संत...

जामदा शिवारात गावठी दारूच्या हातभट्टीवर मेहुणबारे पोलिसांचा छापा ६००...

चाळीसगाव (प्रतिनिधी) : २२ सप्टेंबर २०२६   मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील जामदा शिवारात गिरणा नदीकाठालगत काटेरी झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून...

संपादक - रजत शेख

Latest