अवैध गुटखा तस्करीविरोधात चाळीसगाव-जळगाव पोलिसांची धडक कारवाई दोन आरोपी ताब्यात; गुटखा, पानमसाला व आयशर वाहनासह १६.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): १८ सप्टेंबर २०२६

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला वेग आला असून, चाळीसगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा तस्करीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले आयशर वाहन असा एकूण १६ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

 

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ठाकुरवाडी, हिरापूर रोड येथील विनोद किराणा स्टोअर्स येथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत नचिकेत सुनील येवले (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

 

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जुने बी. जे. मार्केट परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी मधुकर धोंडू इंगळे (वय ४८, रा. खेडी, शिवनगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

 

इंगळे याच्या ताब्यातील MH-४८-AY-१८४८ क्रमांकाच्या आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला आढळून आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

१६.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

या दोन्ही कारवायांमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला यांची किंमत १ लाख ९९ हजार ८१८ रुपये, तर आयशर वाहनाची किंमत १५ लाख रुपये असून, एकूण १६ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला नेमका कोठून आणण्यात आला होता, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

 

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अकरम शेख, मुरलीवर धनगर, किशोर पाटील, प्रविण भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे, गोपाळ पाटील, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळे तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल भुपेश वंजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल दत्तु सावळे, राकेश महाजन सहभागी होते.

 

प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या अवैध विक्री अथवा वाहतुकीची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत मेहुणबारे...

मेहुणबारे (प्रतिनिधी : मसूद सय्यद) : १९ सप्टेंबर २०२६   लांबे (ता. चाळीसगाव) येथील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी चोरणाऱ्या टोळीचा...

पर्यावरणपूरक तोरणमाळांतून गणेशोत्सवाचा संस्कृती व निसर्ग संवर्धनाचा संदेश

मेहरूण (प्रतिनिधी):येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्राथमिक विभागाचा अभिनव उपक्रम गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री...

वाहनचालक दिनानिमित्त चालकांचा गौरव; इच्छादेवी पोलीस चौकीत विशेष कार्यक्रम

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान) १७ सप्टेंबर २०२६ रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक वस्तूंची वेळेत ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गुरुवारी (१७ सप्टेंबर) इच्छादेवी पोलीस...

संपादक - रजत शेख

Latest