राष्ट्रपती पदकप्राप्त PSI दिनेश बडगुजर यांचा सत्कार ‘सेवा संकल्प’ अभियानातून विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठेचा संदेश

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी ): सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपती पदकप्राप्त पोलीस उपनिरीक्षक (PSI) दिनेश बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला.

सन 1992 मध्ये पोलीस अंमलदार म्हणून पोलीस सेवेत दाखल झालेल्या दिनेश बडगुजर यांनी 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली आहे. पोलीस दलातील विविध शाखांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर 1 ऑगस्ट 2025 रोजी त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. सध्या ते अमानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष, जळगाव येथे कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण सेवाकार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे.

 

कार्यक्रमास API विजय पाटील व PSI सलीम शेख पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते PSI दिनेश बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मान्यवरांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी पोलीस सेवेसंदर्भात विविध प्रश्न विचारत मान्यवरांकडून मार्गदर्शन घेतले.

 

कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे PSI दिनेश बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना ‘सेवा संकल्प’ दिला. देश, समाज, शाळा आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून शिस्तबद्ध, प्रामाणिक व जबाबदार नागरिक म्हणून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

“सेवा ही केवळ नोकरी नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प करावा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘पुरस्कारातून प्रेरणा आणि सेवेतून संस्कार’ हा प्रेरणादायी संदेश मिळाला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा पर्यावरणपूरक पद्धतीने रोप व बीजभेट देऊन सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमास मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण अटकेत मेहुणबारे...

मेहुणबारे (प्रतिनिधी : मसूद सय्यद) : १९ सप्टेंबर २०२६   लांबे (ता. चाळीसगाव) येथील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी चोरणाऱ्या टोळीचा...

अवैध गुटखा तस्करीविरोधात चाळीसगाव-जळगाव पोलिसांची धडक कारवाई दोन आरोपी...

जळगाव(प्रतिनिधी): १८ सप्टेंबर २०२६ जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला वेग आला असून, चाळीसगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा तस्करीविरोधात...

पर्यावरणपूरक तोरणमाळांतून गणेशोत्सवाचा संस्कृती व निसर्ग संवर्धनाचा संदेश

मेहरूण (प्रतिनिधी):येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्राथमिक विभागाचा अभिनव उपक्रम गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री...

संपादक - रजत शेख

Latest