शिरसोली परिसरातून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Spread the love

शिरसोली(प्रतिनिधी) : परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही १९ मे २०२६ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही ती आढळून न आल्याने मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत, अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४३४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी राजेंद्र उगले करीत असून, मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest