पी. एल. शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे यांचा जळगाव जिल्हा दौरा

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी: सतीश दहीकर):जळगाव : पी. एल. शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे यांचा जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांची महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

 

या बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न तसेच संघटनेच्या बळकटीकरणासंदर्भातील विविध संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे.

 

बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे जळगाव जिल्हाध्यक्षांची निवड तसेच नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याची आगामी दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहर परिसरातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संघटनात्मक बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पत्रकार संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि व्यापक करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, नवीन जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या व हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest