बहिणीच्या प्रेमासोबत निसर्गाची काळजी; संत ज्ञानेश्वर विद्यालयाची ‘लाडकी बहीण योजना’!

Spread the love

रक्षाबंधनानिमित्त भाऊ देणार बहिणींना दर महिन्याला विविध प्रकारचे रोपे जगविण्यासाठी . १०. बिया; वृक्षसंवर्धनाचा अभिनव संकल्प

जळगाव : (प्रतिनिधी: सरिता महाजन):शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने ‘लाडकी बहीण योजना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत भाऊ आपल्या बहिणीला दर महिन्याला १० बिया भेट देणार असून, या बियांचे रोपांमध्ये रूपांतर करून त्यांचे संगोपन करत मोठे वृक्ष तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

 

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला केवळ राखी किंवा भेटवस्तू न देता भविष्यातील हिरवाईची भेट देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

 

बहिणींनी या बियांची लागवड करून त्यांची नियमित काळजी घ्यावी, तसेच प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या दहा बियांचे संवर्धन करून त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर करावे, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 

परिसरात नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाने पुन्हा एकदा शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धनाची सवय आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा विद्यालयाचा हा प्रयत्न आहे.

 

“राखीचे नाते जपूया, बियांचे झाड करूया आणि भावाच्या प्रेमाची आठवण हिरवाईतून जपूया,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest