विद्यार्थ्यांच्या समस्यांना मिळणार त्वरित न्याय; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘विद्यार्थी समस्या निवारण प्रणाली’चा शुभारंभ

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडता यावे तसेच पालकांनाही शाळेच्या गुणवत्ता विकासात सक्रिय सहभाग घेता यावा, या उद्देशाने संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे “विद्यार्थी समस्या निवारण प्रणाली” आणि “पालक तक्रार व सूचना पेटी” या अभिनव उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

 

या उपक्रमांतर्गत शाळेत “माझी समस्या – माझे समाधान” ही विद्यार्थी समस्या पेटी तसेच “पालक तक्रार व सूचना पेटी” उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधून विद्यार्थी शैक्षणिक अडचणी, शिस्त, स्वच्छता, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य, ग्रंथालय आदी विषयांवरील समस्या व सूचना नोंदवू शकतील. तसेच पालकही आपल्या पाल्याच्या शिक्षणाशी संबंधित अडचणी, शाळेतील सुविधा किंवा विधायक सूचना लेखी स्वरूपात पेटीत टाकू शकतील.

 

प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींवर विद्यार्थी संसद, शिक्षक, मुख्याध्यापक आणि आवश्यकतेनुसार पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन शाळेच्या गुणवत्ता वृद्धीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थी व पालकांना कोणतीही समस्या किंवा विधायक सूचना निःसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि SQAAF च्या गुणवत्ता निकषांनुसार लोकसहभाग, पारदर्शकता आणि विद्यार्थी-केंद्रित व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; २४...

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील विविध महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अल्पवयीनांकडून होणारे वाहन चालविण्याचे प्रकार रोखावेत यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम...

गुरुपौर्णिमेला हरित गुरुदक्षिणा; विद्यार्थिनींकडून पर्यावरणप्रेमी मुख्याध्यापकांना इनडोअर वृक्ष भेट

मेहरुण (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत विद्यालयाचे...

भुसावळात पोलीस व RPF ची संयुक्त धडक कारवाई; भंगार...

भुसावळ(प्रतिनिधी) : भुसावळ शहर तसेच लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रेल्वे व दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या गुन्हेगारीला...

संपादक - रजत शेख

Latest