घरफोडी करणारे अट्टल चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात; सोन्याचे दागिने व तीन मोबाईलसह ₹70 हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान):शहरातील मलिक नगर, बॉम्बे बेकरीमागील परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल असा एकूण ₹70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मलिक नगर येथील घरात 25 जुलै 2026 रोजी रात्री 11.30 ते 26 जुलै 2026 रोजी पहाटे 4.30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व तीन मोबाईल चोरी करून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. 625/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) व 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ ललित नारखेडे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे आणि मोतीलाल बोरसे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

 

पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर 28 जुलै 2026 रोजी मास्टर कॉलनी परिसरात सापळा रचून आदिल खान सादिक खान (वय 30) आणि अरजान उर्फ दालचावल खान अक्रम खान (वय 30, दोघेही रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

 

आरोपींकडून सुमारे ₹40 हजारांचे सोन्याचे दागिने तसेच विवो वाय-12, विवो वाय-35 आणि रेडमी कंपनीचे तीन मोबाईल असा एकूण ₹70 हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest