जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील विविध महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अल्पवयीनांकडून होणारे वाहन चालविण्याचे प्रकार रोखावेत यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत तब्बल २४ अल्पवयीन वाहनचालक आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये याबाबत समुपदेशन करण्यात आले.

याशिवाय विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण १,४७,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ८२,००० रुपये ऑन-द-स्पॉट वसूल करण्यात आले. तसेच ११९ ई-चलनही जारी करण्यात आले.

ही विशेष कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली केली. वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेमुळे महाविद्यालय परिसरात वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest