मेहरूणात ‘सीड बँक’ची अनोखी मोहीम; बियांमधून रुजणार हरित भविष्य 🌳

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):मेहरूण :  उष्णतेने आणि बदलत्या हवामानाने संपूर्ण जग चिंतेत असताना श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शाळेत “सीड बँक” संकल्पना सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्येही या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने “फळ खा, पण बी फेकू नका” असा संदेश देत शाळेने आंब्यासह विविध फळांच्या बिया जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे. जमा होणाऱ्या बियांपासून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेम आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

शाळेच्या या अभिनव संकल्पनेचे परिसरातून कौतुक होत असून अनेक पालक आणि नागरिकांनीही उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. “आज जमा होणारी प्रत्येक बी उद्याच्या हरित भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे,” असे मत मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच सर्व नागरिकांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

लातूर पोलिसांची धाडसी कारवाई; गावठी पिस्तूलासह आरोपी ताब्यात

लातूर(प्रतिनिधी ): सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध शस्त्र व्यवहाराचा प्रयत्न उधळून लावला. २७ मे २०२६...

इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात जळगावात काँग्रेस आक्रमक; भाजपा सरकारचा...

जळगाव (प्रतिनिधी): देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि सीएनजीच्या दरांविरोधात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी, जळगाव शहर काँग्रेस तसेच रावेर लोकसभा काँग्रेसच्या...

चाळीसगाव तालुक्यात विषारी औषध प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावातील १८ वर्षीय युवकाचा विषारी औषध प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उपचार सुरू असताना...

संपादक - रजत शेख

Latest