जळगाव:झिरो फेटॅलिटी मोहिमेत वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई; ३७५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):दि. १५ जुलै : जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली आज “झिरो फेटॅलिटी” व अपघात प्रतिबंधक विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत नथमल कन्या माध्यमिक शाळा, आयटीआय कॉलेज, एम. जे. कॉलेज रोड, बसस्थानक परिसर, कालिंका माता परिसर, डी-मार्ट शिरसोली नाका, कॉलेज परिसर, कलेक्टर कार्यालय परिसर तसेच दाणा बाजार परिसर येथे विशेष तपासणी करण्यात आली.

 

कारवाईदरम्यान अल्पवयीन वाहनचालक, फ्रंट सीट/फ्रेंडशिप रिक्षा, विना परवाना वाहनचालक, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, नो पार्किंग, सार्वजनिक रहदारीस अडथळा तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

 

पहिल्या विशेष मोहिमेत १९२ वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे २ लाख ३२ हजार रुपयांचे ई-चलान करण्यात आले, तर १३ हजार ४०० रुपये रोख दंड वसूल करण्यात आला. त्यानंतरच्या विशेष कारवाईत १७३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून ९ हजार ७०० रुपये रोख दंड वसूल करण्यात आला.

 

याशिवाय अपघात प्रतिबंधक नाकाबंदी मोहिमेत अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर १०, विना परवाना व कागदपत्रे नसल्याप्रकरणी ३६, ट्रिपल सीट ५, अवैध प्रवासी वाहतूक १ आणि ड्रंक अँड ड्राईव्ह २ अशा एकूण ५४ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १० हजार रुपये रोख दंड वसूल करण्यात आला.

 

दिवसभरातील विविध मोहिमांमध्ये एकूण ४१९ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे. सर्व कारवाया शांततेत पार पडल्या.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘एक विद्यार्थी – एक कौशल्य’...

जळगाव(प्रतिनिधी): रामेश्वर कॉलनी येथील रोजी मेहरून जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे "एक विद्यार्थी – एक कौशल्य"...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला भारत विकास परिषदेकडून सॅनिटरी नॅपकिन...

मेहरूण (प्रतिनिधी: सरित महाजन): विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत विकास परिषद, जळगाव शाखेच्या वतीने मेहरूण येथील श्री...

नैसर्गिक प्रकाशात भरला ज्ञानाचा वर्ग; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात...

मेहरुण (प्रतिनिधी): जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लबच्या वतीने 'नो इलेक्ट्रिसिटी डे' हा अभिनव उपक्रम...

संपादक - रजत शेख

Latest