जळगाव(प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांना सामोपचाराने पूर्णविराम देण्यासाठी आज, शनिवार (दि. ९ मे २०२६) रोजी जळगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम होत असून, मोठ्या संख्येने प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषविणार आहेत. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा वकील संघ, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका प्रशासन यांचे सहकार्य लाभत आहे.
या लोक अदालतीत मोटार वाहन ट्रॅफिक चलन, चेक बाऊन्स, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, दिवाणी तसेच तडजोडयोग्य फौजदारी प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांसोबतच दाखलपूर्व प्रकरणेही सामोपचाराने निकाली काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, मोबाईल व दूरसंचार कंपन्यांकडून थकीत रकमेवर सवलती देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सहमतीने वाद मिटवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ज्या पक्षकारांना आपले प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढायचे आहे, त्यांनी आपल्या वकिलांसह लोक अदालतीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच ऐनवेळीही तडजोडीसाठी प्रकरणे सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जळगाव(प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांना सामोपचाराने पूर्णविराम देण्यासाठी आज, शनिवार (दि. ९ मे २०२६) रोजी जळगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम होत असून, मोठ्या संख्येने प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषविणार आहेत. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा वकील संघ, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका प्रशासन यांचे सहकार्य लाभत आहे.
या लोक अदालतीत मोटार वाहन ट्रॅफिक चलन, चेक बाऊन्स, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, दिवाणी तसेच तडजोडयोग्य फौजदारी प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांसोबतच दाखलपूर्व प्रकरणेही सामोपचाराने निकाली काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, मोबाईल व दूरसंचार कंपन्यांकडून थकीत रकमेवर सवलती देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सहमतीने वाद मिटवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ज्या पक्षकारांना आपले प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढायचे आहे, त्यांनी आपल्या वकिलांसह लोक अदालतीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच ऐनवेळीही तडजोडीसाठी प्रकरणे सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.