भररस्त्यात एसटी बस थांबल्याने वाहतुकीत मोठा अडथळा; प्रवाशांची रस्त्यावरच उतराई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: संभाजी नाल्कोल) शहरामध्ये

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस भररस्त्यात अचानक थांबल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना समोर आली आहे. बस रस्त्यावर थांबल्यानंतर प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागल्याचे दिसून आले.

भरधाव वाहतुकीच्या मार्गावर बस थांबल्यामुळे इतर वाहनांची मोठी कोंडी झाली. परिणामी वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. काही काळ वाहतुकीचा वेग मंदावल्याने नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.

अशा प्रकारे रस्त्यावरच बस थांबल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

 

वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अशा घटनांकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest