अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणास विरोध; लोकसंघर्ष समितीचे निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

जळगाव:( प्रतिनिधी: इमरान खान):

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, अशी मागणी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोकसंघर्ष समिती, जळगाव जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध दर्शविला.

 

निवेदनात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणाचे अ, ब, क आणि ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याचा विचार करीत आहे. यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून संबंधित अहवाल मागविला असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

 

लोकसंघर्ष समितीने या प्रक्रियेबाबत अनेक आक्षेप नोंदविले आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, अहवाल तयार करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व ५९ जातींच्या प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आलेली नाहीत. तसेच १९३० नंतर जातीनिहाय जनगणना झालेली नसल्याने अनुसूचित जातींच्या लोकसंख्येसंदर्भातील उपलब्ध आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

 

२०११ ची लोकसंख्या २०२६ मध्ये उपवर्गीकरणासाठी निकष म्हणून वापरणे योग्य नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. २०२१ ची जनगणना अद्याप पूर्ण झालेली नसल्याने अनुसूचित जाती प्रवर्गाची अद्ययावत व निश्चित लोकसंख्या उपलब्ध नाही. त्यामुळे जुन्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे उपवर्गीकरणाचा निर्णय घेणे अन्यायकारक ठरू शकते, असा दावा समितीने केला आहे.

 

संविधानातील कलम ३४१ चा संदर्भ देत समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भूमिकेचाही उल्लेख केला आहे. अनुसूचित जातींसंदर्भातील अधिकार व धोरणांमध्ये देशपातळीवर एकसूत्रता असणे आवश्यक असल्याची भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.

 

तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणासंदर्भातील विविध न्यायालयीन निर्णयांचा उल्लेख करून प्रस्तावित उपवर्गीकरणाचा गांभीर्याने पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

अनुसूचित जाती आरक्षणाचे प्रस्तावित उपवर्गीकरण लागू करू नये व संबंधित समितीच्या अहवालाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी लोकसंघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

 

या निवेदनावर मुकुंद सपकाळे, जयसिंग वाय यांच्यासह समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बहिणीच्या प्रेमासोबत निसर्गाची काळजी; संत ज्ञानेश्वर विद्यालयाची ‘लाडकी बहीण...

रक्षाबंधनानिमित्त भाऊ देणार बहिणींना दर महिन्याला विविध प्रकारचे रोपे जगविण्यासाठी . १०. बिया; वृक्षसंवर्धनाचा अभिनव संकल्प जळगाव : (प्रतिनिधी: सरिता महाजन):शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी...

नर्मदेश्वर महादेव मंदिरात भंडारा; कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी...

जळगाव(संपादक: रजत शेख) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा बाजार समितीतील व्यापारी, हमाल,...

प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी साकारल्या मातीच्या कलाकृती

मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन) :श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनविण्याचा सर्जनशील उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी...

संपादक - रजत शेख

Latest