जळगाव(प्रतिनिधी ):दि. २२ ऑगस्ट २०२६ : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मोहम्मद शहा अस्लम शहा याला भुसावळ येथून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एकूण ९५ हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अयोध्यानगर, जळगाव येथील रहिवासी मनोज शंकराव गरुड यांच्या मालकीची सीबी शाईन मोटारसायकल क्रमांक MH-19 DD 8323 ही त्यांचा मुलगा प्रथम गरुड याने १४ ऑगस्ट रोजी सकाळी एमआयडीसी, व्ही-सेक्टर येथील लिड्स इंडस्ट्रीज कंपनीत लावली होती. सायंकाळी काम आटोपून परतल्यानंतर मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६७०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीष पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
त्यानंतर पथकाने मोहम्मद शहा अस्लम शहा याला भुसावळ येथून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांमध्ये २५ हजार रुपये किमतीची सीबी शाईन (MH-19 DD 8323), २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची विनाक्रमांक स्लेंडर मोटारसायकल (चेसिस क्र. MBLHAR075HHL27654) आणि ५० हजार रुपये किमतीची बजाज सिटी १०० विनाक्रमांक मोटारसायकल (चेसिस क्र. MD2A18AYIJWF06484) यांचा समावेश आहे. अशा एकूण ९५ हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि योगेश घुगे यांनी सहभाग घेतला.








