शून्य फेटालिटी मोहिमेत महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम; 71 वाहनांवर कारवाई, ₹50,500 दंड

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी) : शहर रस्ते अतिक्रमणामुळे निर्माण होणारे अपघाताचे धोके कमी करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी शून्य फेटालिटी मोहिमेअंतर्गत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत एसआरपीएफ, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पीएसआय कृष्णा पाटील, शहर वाहतूक शाखेचे पीएसआय सोनवणे, वाहतूक शाखेचे अंमलदार, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी धनराज पाटील यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला.

इच्छादेवी चौक ते अजिंठा चौक या मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईसाठी महानगरपालिकेचे तीन ट्रॅक्टर तैनात करण्यात आले होते. अतिक्रमणातील साहित्य व मालमत्ता ट्रॅक्टरमध्ये भरून महानगरपालिकेच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आली.

 

दरम्यान, रस्त्यावरील अतिक्रमण व सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील कलम 122/177 अंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान उपलब्ध पुराव्यांच्या आधारे विविध प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत धनराज बडगुजर, जगदीश भोई, कादिर शेख, पीएसआय सोनवणे, रमेश, विकास पाटील आणि विशाल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

 

कारवाईचा तपशील

 

महामार्ग व सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या खासगी कार, ट्रक, टेम्पो, रिक्षा, खासगी बस, दुचाकी, मल्टी अॅक्सल ट्रक व पर्यटक वाहनांवर कारवाई करण्यात आली.

 

या मोहिमेत एकूण 71 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहनचालकांकडून एकूण ₹50,500 दंड आकारण्यात आला.

 

प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे महामार्गावरील अतिक्रमण हटवून वाहतूक अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यातही रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणास विरोध; लोकसंघर्ष समितीचे निवासी उप...

जळगाव:( प्रतिनिधी: इमरान खान): महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, अशी मागणी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोकसंघर्ष समिती, जळगाव जिल्हाच्या...

बहिणीच्या प्रेमासोबत निसर्गाची काळजी; संत ज्ञानेश्वर विद्यालयाची ‘लाडकी बहीण...

रक्षाबंधनानिमित्त भाऊ देणार बहिणींना दर महिन्याला विविध प्रकारचे रोपे जगविण्यासाठी . १०. बिया; वृक्षसंवर्धनाचा अभिनव संकल्प जळगाव : (प्रतिनिधी: सरिता महाजन):शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी...

नर्मदेश्वर महादेव मंदिरात भंडारा; कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी...

जळगाव(संपादक: रजत शेख) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा बाजार समितीतील व्यापारी, हमाल,...

संपादक - रजत शेख

Latest