एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; 80 किलो गोमांसासह 4 आरोपी ताब्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने जळगाव शहरातील पिरजादे वाडा परिसरात छापा टाकून 80 किलो गोमांस जप्त केले असून या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गोमांसासह मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामा मशिदीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार पंचांसह पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

 

छाप्यामध्ये युसुफ खान इस्माईल खान (वय 52, रा. लक्ष्मीनगर, दत्तनगर मेहरुण), शफी शेख बाबुलाल कुरेशी (वय 52, रा. तांबापुरा), शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (वय 42, रा. तांबापुरा) आणि शेख रईस शेख मुनाफ (वय 40, रा. नवी कॉलनी, पाळधी) हे गोमांस विक्री करताना आढळून आले.

 

पोलिसांनी घटनास्थळावरून 16 हजार रुपये किमतीचे 80 किलो गोमांस, 600 रुपये किमतीचे सहा लोखंडी सुरे, 100 रुपये किमतीची कुऱ्हाड आणि 200 रुपये किमतीचा वजनकाटा असा एकूण 16 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

या प्रकरणी पोलीस अंमलदार अफजल रफियोद्दीन बागवान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक 636/2026 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(क) व 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी दीपक महाजन करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, धनराज गुळवे, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे तसेच किरण पाटील, राहुल घेटे आणि नितीन ठाकूर यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात ३ दिवस वाहतुकीत मोठा बदल; रेल्वे ब्रिज दुरुस्तीमुळे...

जळगाव(प्रतिनिधी ): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरता बदल केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन...

शाळा व्यवस्थापन समितीचा अभिनव उपक्रम; फ्रेंडशिप डे निमित्त नशामुक्तीचा...

मेहरुण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये खरी मैत्री, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्त समाजाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे...

जळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई; 62.07 ग्रॅम एमडी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी) : "नशामुक्त भारत" अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जळगाव जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

संपादक - रजत शेख

Latest