जळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई; 62.07 ग्रॅम एमडी जप्त, 3.58 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी) : “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जळगाव जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 62.07 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ, सेक्टर ए-14 समोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला.

 

दिनांक 31 जुलै 2026 रोजी रात्री 10.40 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने संशयित इम्रान खान हयात खान (वय 36, रा. आव्हाणे, ह.मु. फातेमा नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 62.07 ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ आढळून आला.

 

कारवाईदरम्यान पोलिसांनी 2 लाख 88 हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, 20 हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि 50 हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर (MH-17-DL-4598) मोटारसायकल असा एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठादार रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याचा सहभाग निष्पन्न झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 635/2026 नुसार एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क), 22(क), 29 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

 

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा डायल 112 वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी

 

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रमोद वाघ, पोउनि दीपक जगदाळे, पोउनि जितेंद्र वल्टे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ अकरम शेख, पोहेकॉ योगेश घुगे, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोहेकॉ किशोर पाटील, पोहेका विजय पाटील, पोकों छगन तायडे, पोकों रविंद्र कापडणे, पोकों प्रदीप सपकाळ, पोकों राहुल रगडे तसेच फॉरेन्सिक युनिटचे पोहेकॉ अमित माळी व पोहेकॉ संघपाल तायडे यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest