जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील विविध महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अल्पवयीनांकडून होणारे वाहन चालविण्याचे प्रकार रोखावेत यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत तब्बल २४ अल्पवयीन वाहनचालक आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये याबाबत समुपदेशन करण्यात आले.

याशिवाय विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण १,४७,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ८२,००० रुपये ऑन-द-स्पॉट वसूल करण्यात आले. तसेच ११९ ई-चलनही जारी करण्यात आले.

ही विशेष कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली केली. वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेमुळे महाविद्यालय परिसरात वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विष्णू उन्नीकृष्ण ओल्लेकात (वय अंदाजे तरुण) असे मृताचे नाव...

विद्यार्थ्यांच्या समस्यांना मिळणार त्वरित न्याय; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘विद्यार्थी...

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडता यावे तसेच पालकांनाही शाळेच्या गुणवत्ता विकासात सक्रिय सहभाग...

गुरुपौर्णिमेला हरित गुरुदक्षिणा; विद्यार्थिनींकडून पर्यावरणप्रेमी मुख्याध्यापकांना इनडोअर वृक्ष भेट

मेहरुण (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत विद्यालयाचे...

संपादक - रजत शेख

Latest