भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Spread the love

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथे फायनान्स कंपनीची रोकड असलेली बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यश हिरामण हटकर (रा. शिवनेरी गेट, भडगाव) यांनी १० जुलै २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमारे ₹५१ हजार ५६० रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात आरोपींनी हिसकावून नेली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात या गुन्ह्यात कलम ३१०(१) चीही वाढ करण्यात आली.

 

स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करत तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या उदय छोटू गायकवाड याने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण कट उघड केला.

 

पोलीस तपासात उघडकीस आले की, उदय गायकवाड हा भारत फायनान्स कंपनी, भडगाव येथे काम करत असल्याने कंपनीची रोकड कोण आणि कोणत्या वेळी घेऊन जातो, याची त्याला संपूर्ण माहिती होती. त्याने साथीदारांसह फायनान्स कंपनीची रोकड लुटण्याचा कट रचला. त्यानुसार ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी आरोपी दोन मोटारसायकलींवर भडगाव येथे आले. काही आरोपींनी रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवली, तर इतरांनी बॅग हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले.

 

अटक आरोपी

 

– उदय छोटू गायकवाड (वय २२, रा. अनकवाडी, जि. धुळे)

– अनिल दिलीप पाटील (वय ३१, रा. पळासखेडा, ता. भडगाव)

– विशाल मधुकर गांगुर्डे (वय २६, रा. पूर्वीपाडा, जि. धुळे)

– निलेश अण्णा पवार (वय २०, रा. अनकवाडी, जि. धुळे)

– योगेश प्रकाश पवार (रा. अनकवाडी, जि. धुळे)

 

या गुन्ह्यातील सागर हिम्मत पाटील (रा. पळासखेडा) आणि हर्षल चांगदेव अहिरे (रा. येवला, जि. नाशिक) हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

 

पोलीसांनी आरोपींकडून सुमारे ₹२५ हजार किमतीची एक मोटारसायकल जप्त केली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील आणि रिजवान शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

 

अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : जबरी चोरीतील मोबाईल हस्तगत;...

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला ६ हजार...

धावत्या बसमधील २५ लाखांची बॅग चोरी उघड; स्थानिक गुन्हे...

जळगाव (प्रतिनिधी): धावत्या लक्झरी बसमधून २५ लाख रुपये रोख असलेली बॅग चोरणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका दिवसात जेरबंद करत...

रामेश्वर कॉलनीत मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन) : वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे तसेच कायमस्वरूपी...

संपादक - रजत शेख

Latest